गडचिरोलीतल्या भामरागडमध्ये 16 नक्षल्यांचा खात्मा; 16 लाखांचं बक्षीस असलेल्या साईनाथलाही कंठस्नान 

गडचिरोलीतल्या भामरागडमध्ये 16 नक्षल्यांचा खात्मा; 16 लाखांचं बक्षीस असलेल्या साईनाथलाही कंठस्नान 

गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत तब्बल 16 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय. डीव्हीसीचे सदस्य असलेले साईनाथ आणि सिनू या दोघांनाही ठार मारण्यात आलंय. राज्यातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जातीय. पोलिसांनी गडचिरोलीत केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 16 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आलं. भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगल परिसरातील पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. 43 वर्षांचा सिनू हा मूळचा वारंगलचा असून त्याचं खरं नाव विजयेंद्र राऊते असं आहे. अनेक जबाबदाऱ्या पार पाडत काही वर्षांपासून तो दक्षिण गडचिरोली डिव्हीजनचा सचिव झाला. सिनूची पत्नीही नक्षल चळवळीत असल्याची माहिती आहे. मात्र ती पैसे घेऊन पळाल्यामुळे चळवळीत त्यांच्याविरोधात असंतोष होता. साईनाथ हा पेरीमिली दलम कमांडर होता. त्याला डिव्हीजनल कमिटी सदस्य बनवण्यात आलं होतं.
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com