महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जन्मशताब्दीनिमित्त भाजप काढणार पद यात्रा

 महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जन्मशताब्दीनिमित्त भाजप काढणार पद यात्रा

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जन्मशताब्दीनिमित्ताने सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे सर्व मंत्री खासदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते देशभरात दीडशे किलोमीटरची पद यात्रा काढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना याबाबतची औपचारिक घोषणा केली.

सलग दुसऱ्यांदा दणदणीत बहुमत मिळवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने आगामी पाच वर्षात गांधी 150 आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हे दोन मेगा इव्हेंट करण्याचे ठरवले आहे त्यानुषंगाने पंतप्रधानांनी आजच्या बैठकीत गांधी पदयात्रा यांची रूपरेखा सांगितली. त्याचप्रमाणे अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्ये सांगताना हा अर्थसंकल्प पुढच्या दहा वर्षातील विकसित भारताला समोर ठेवून मांडण्यात आल्याचे सांगितले.

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर सांगितले की गांधीजींच्या दीडशेव्या जन्मशताब्दीनिमित्त 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या काळात  भाजप देशभरात दीडशे किलोमीटर पदयात्रा काढणार आहे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात यात्रा काढल्या जातील त्यासाठी सभा मतदार संघ निहाय 23 कार्यकर्त्यांचे गट केले जातील राज्यसभेच्या खासदारांना भाजप जेथे कमजोर आहे अशा राज्यांमध्ये पदयात्रेसाठी पाठवण्यात येईल. पदयात्रा बरोबरच महात्मा गांधी स्वातंत्र्यलढा यांच्या बाबत, तसेच वृजलसंवरधन   व वृक्षारोपणाचे कार्यक्रम दैशभरात आयोजित केले जातील.

पंतप्रधान मोदी सकाळी पावणे दहाच्या सुमारास संसद ग्रंथालयाच्या सभागृहात पोहोचले. त्यावेळी उपस्थित खासदारांची संख्या तुलनेने कमी असल्याचे पाहून त्यांनी, कम संख्या दिख रही है, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Web Title: Gandhi rally by Bhartiya Janata Party on Mahatma Gandhi s 150th birth anniversary

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com