सोनं पोहोचणार 40 हजारांवर ?

सोनं पोहोचणार 40 हजारांवर ?

गेल्या काही दिवसांपासून सोन्यांच्या दरामध्ये सातत्यानं वाढ होतेय. आता सोन्याच्या दरानं 34 हजार 200 चा टप्पा गाठलाय. येत्या काही दिवसात सोनं 35 हजारांचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. तब्बल 20 वर्षानतर सोन्याच्या दरांमध्ये जागतिक पातळीवर ही विक्रमी वाढ झालीय.

अमेरिकेतील बँकांनी सोन्यावरील व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोनं खरेदी सुरू केली आहे. त्यामुळं जागतिक बाजारेपेठेत सोन्याचे भाव वाढण्यात झाली आहे. अमेरिका-इराणचे ताणलेले संबंध, अमेरिका-चीनमध्ये भडकलेले व्यापार युद्ध, तेलाचे पडलेले भाव, डॉलरचे अवमूल्यन, शेअर बाजारऐवजी सोन्यासारख्या धातूमधील गुंवतणुकीला गुंतवणूकदार पसंती देत आहेत. अशा अनेक कारणांचाही सोन्याच्या दरवाढीवर परिणाम होतो आहे.  

सोन्याच्या दरात वाढ होत असल्यामुळं सोने खरेदीसाठी उत्सूक असलेल्या महिलांचा मात्र हिरमोड झालाय. महिलांनी याबाबत नाराजी व्यक्त केलीय. 

सोन्यात दरात ही वाढ होत असतानाच चांदिच्या दरात मात्र घसरण होतेय. भारतीय प्रामुख्यानं सणासुदीला आणि विवाह समारंभाच्या निमित्तानं सोने खरेदी करतात. मात्र वाढत असलेल्या दरामुळं सोने खरेदीचा बेत काही प्रमाणात भारतीयांना आखडता घ्यावा लागणार आहे.

WebTitle : marathi news gold rates may reach upto forty thousand if there is war between america and Iran 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com