GST काउंन्सिलच्या बैठकीत ३३ वस्तूंवरील GST मध्ये कपात

GST काउंन्सिलच्या बैठकीत ३३ वस्तूंवरील GST मध्ये कपात

आज जीएसटी परिषदेची 31 वी बैठक आज नवी दिल्लीमध्ये पार पडली. GST परिषदेच्या या बैठकीत 33 वस्तुंवरच्या जीएसटीमध्ये कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. टीव्ही, संगणक, टायर, १०० रुपयांवरील सिनेमाची तिकिटं यावरच्या जीएसटीत कपात करण्यात आलीय. हा जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली. दरम्यान, जनधन खात्यांवरील सेवा कर जीएसटीमधून वगळण्यात आला आहे. 

जीएसटी १८ टक्क्यांपेक्षा कमी झालेल्या वस्तू

  • धार्मिक यात्रांवरचा GST 12 टक्के असेल 
  • फूटवेअरवरचा  GST 12 ते 5 टक्के असा करण्यात आलाय 
  • थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्सचा GST 12  टक्क्यांवर आणला गेलाय टक्के
  • फ्रोझन भाज्यांवरील GST हटवण्यात आलाय     


२८ टक्क्यावरून १८ टक्क्यावर आलेल्या वस्तू

  • मॉनिटर्स आणि ३२ इंचापर्यंतचा टीव्ही
  • पॉवर बँक 
  • १०० रुपयांवरचे सिनेमा तिकिट
  • लिथियम बॅटरी
  • टायर
  • स्नूकर आणि बिलियर्ड्स टेबल्स 

जीएसटी परिषदेच्या बैठकीत महसूल या विषयावर मोठी चर्चा झाली. दोन समित्यांनी त्यांची त्यांची मतं मांडली, असंही जेटली यांनी  घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. 

WebTitle : marathi news GST council meet gst on 33 goods and services reduced says FM arun jaitely

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com