अमली पदार्थ घेऊन पाकिस्तानहून येणाऱ्या बोटवर गुजरात एटीएसकडून कारवाई

अमली पदार्थ घेऊन पाकिस्तानहून येणाऱ्या बोटवर गुजरात एटीएसकडून कारवाई

गुजरात : पोरबंदरजवळ गुजरात एटीएसकडून ड्रग्ज माफियांवर कारवाई करण्यात आली. 500 कोटींचे अमली पदार्थ घेऊन पाकिस्तानहून बोट येताना  ही कारवाई करण्यात आली. यामध्ये 9 इराणी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार कोट्यवधीचे अमली पदार्थ घेऊन एक पाकिस्तानी बोट पोरबंदरजवळ भारतीय सागरी हद्दीत धुसली होती. या बोटीबाबत संशय आल्यावर भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्त कारवाई करत या बोटीला घेरले. त्यानंतर या बोटीतील नऊ तस्करांना ताब्यात घेण्यात आले. मात्र कारवाई सुरू असताना बोटीत असलेल्या काही जणांनी बोटीला आग लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी बोटीमधील हेरॉइनने भरलेल्या चार पिशव्या जप्त करण्यात यश मिळवले. 

दरम्यान, पाकिस्तानमधून पोरबंदर येथे आणण्यात येत असलेले हे अमली पदार्थ देशभरात पाठवण्यात येणार होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: gujarat ats and icg destroys pakistani boat with 500 crores drugs in mid sea of porbandar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com