नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता

नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता

पुणे : गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात संततधार पाऊस होत असून, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील 24 तासांत पुणे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

पुण्यात पुढील दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. कोकणात अनेक ठिकाणी शंभर मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर आठ ठिकाणी 200 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. रत्नागिरीतील हेदवी येथे सर्वाधिक 245 मिलिमीटर पाऊस पडला. 

पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रात कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा, नगर आणि जळगाव जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा, विदर्भात हलक्‍या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांतही कमी अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागरात कमीदाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, तीव्र होत असलेल्या प्रणालीमुळे मॉन्सून सक्रिय होऊन, राज्यात पाऊस जोर धरणार आहे.

Web Title: Heavy rainfall likely to occur at isolated places in the districts of Jalgaon and Pune

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com