पुण्यात पुन्हा एकदा हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा

पुण्यात पुन्हा एकदा हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा

पुणे - लोकसभा निवडणूक आटोपताच शहर पोलिसांनी पुन्हा एकदा हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

निवडणुकीच्या काळात हेल्मेटबाबत सबुरीने कारवाई करा, असा पोलिसांना सल्ला देणारे पालकमंत्री गिरीश बापट आता दिल्लीला पोचल्यामुळे पोलिसांनी कारवाईची तीव्रता वाढविली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत सापडलेले पुणेकर आणखीनच त्रस्त झाले आहेत. 

लोकसभा निवडणुकीमुळे हेल्मेट सक्तीबाबत मुख्यमंत्री फडणवीस, बापट यांनी सबुरीने घेण्याबाबत पोलिसांना सांगितले होते. त्याची अंमलबजावणी पोलिसांनी केली अन्‌ बापट विजयी होताच हेल्मेटबाबतच्या कारवाईची तीव्रताही वाढविली. 

शहराच्या मध्यभागात तसेच उपनगरांतील वाहतूक कोंडी वाढत असतानाच पोलिस मात्र नियमनापेक्षा कारवाईवरच भर देत असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पोलिस व नागरिकांमध्ये वादाचे प्रकार घडत आहेत. हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांवर मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याची सद्यःस्थिती आहे. 

वाहतूक पोलिसांची मारहाण 
करण नाईकनवरे व शुभम सोनवळ हे दोघे जण शुक्रवारी रात्री आठ वाजता जंगली महाराज रस्त्यावरून रस्ता ओलांडून आपटे रस्त्यावर जाण्यासाठी वळले. त्या वेळी पथिक हॉटेलसमोर डेक्कन वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी उभे होते. त्यांनी दुचाकी अडवून विरुद्ध दिशेने येण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर ३०० रुपयांची मागणी केली, त्या वेळी शुभमने त्याचे मोबाईलवर चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी शुभमला मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडून ११०० रुपये दंड घेतला. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनीही त्यांची दखल घेतली नाही.

हेल्मेट कारवाई जानेवारी महिन्यापासूनच सुरू आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांना दंड आकारला जातो. शहर वाहतूक शाखेकडून वाहतूक शाखेच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे काम केले जात आहे.
- जगन्नाथ कळसकर, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक नियोजन

Web Title: Helmet Use Crime Police

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com