आमदारांचा राग शांत होईल आणि आमचे मनोमिलन नक्कीच होईल: शिवकुमार

आमदारांचा राग शांत होईल आणि आमचे मनोमिलन नक्कीच होईल: शिवकुमार

मुंबई : मुंबईवर माझे प्रेम आहे. मी माझ्या मित्रांना भेटल्याशिवाय परतणार नाही. मी त्यांना एकटे सोडणार नाही, ते नक्कीच माझ्याशी संपर्क साधतील. त्यांचा राग शांत होईल आणि आमचे मनोमिलन नक्कीच होईल. मी त्यांच्याशी संपर्कात आहे. आम्हाला कोणाही वेगळे करु शकत नाही. आमची हृदयं एकमेकांसाठी धडधडतात, असे काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांनी म्हटले आहे. हॉटेल व्यवस्थापनाने त्यांचे बुकिंग रद्द केल्यानंतर त्यांनी मुंबई सोडणार नसल्याचे सांगितले.

शिवकुमार यांना पोलिसांनी हॉटेलमध्ये येण्यास मज्जाव केला. यामुळे या उपमुख्यमंत्र्यांना आपल्या कार्यकर्त्यांसह हॉटेलच्या लॉबीमध्येच ठिय्या मांडून बसावे लागल्याने वेगळच नाट्य रंगल्याचं दिसलं.

कर्नाटकचे 10 बंडखोर आमदार पवईतील रेनायसंस हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार सकाळी हॉटेलमध्ये आले असता पोलिसांनी त्यांना हॉटेलमध्ये येण्यापासून रोखलं. हॉटेल मधील आमदारांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. 

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी रेनायसंस हॉटेलमधील रूम बुक केली होती. आज सकाळी शिवकुमार यांना पोलिसांनी हॉटेलमध्ये येण्यापासून रोखल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये आपलं रूम बुक असल्याचे सांगितले. मात्र, हॉटेक व्यवस्थापनाने शिवकुमार यांनी बुक केलेली रूम रद्द करत तसा मेल त्यांना केल्याने शिवकुमार यांना अखेर नमते घ्यावे लागले.

Web Title: I will not return without meeting my friends says D K Shivkumar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com