ऑनलाइन पद्धतीने आज ICAI तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल होणार जाहीर 

ऑनलाइन पद्धतीने आज ICAI तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल होणार जाहीर 

आयसीएआयतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल ऑनलाइन पद्धतीने आज जाहीर होणार आहे. सायंकाळी सहा वाजता इन्स्टिट्यूटच्या वेबसाइटवर हा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे. 'आयसीएआय'तर्फे मे आणि जून २०१८ मध्ये सीए अभ्यासक्रमासाठी सीपीटी, फाउंडेशन आणि फायनल परीक्षा घेण्यात आली होती. फायनल परीक्षा आणि फाउंडेशन परीक्षेतील देशभरातील ५० गुणवंत विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. ही गुणवत्ता यादी संस्थेच्या वेबसाइटवरही उपलब्ध असेल. 

यंदा जुन्या अभ्यासक्रमानुसार १,२१,८५० विद्यार्थ्यांनी फायनल परीक्षा दिली आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार ५,४०६ विद्यार्थ्यांनी फायनल परीक्षा दिली आहे. सीपीटी परीक्षेसाठी ५७,४२१ विद्यार्थी बसले होते, तर ६,७८८ विद्यार्थ्यांनी फाउंडेशन परीक्षा दिली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com