महाराष्ट्रदिनी गडचिरोलीत रक्तपात.. 15 जवान शहीद झाल्याची भीती..

महाराष्ट्रदिनी गडचिरोलीत रक्तपात.. 15 जवान शहीद झाल्याची भीती..

गडचिरोली : नक्षल विरोधी अभियान राबविण्यासाठी जात आसलेले वाहन नक्षलवाद्यांनी भुसुरुंग स्फोटाने उडवून दिले. यात जलद राखीव दलाचे 15 जवान शहीद झाले असून, खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे.

ही घटना कुरखेडा येथून जवळ असलेल्या लेंडारी गावाजवळ आज (ता.01) घडली. महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील पोलिसांचा गौरव होत असताना आज 15 जवानांना शहीद व्हावे लागल्याने पोलिस विभागावर शोककळा पसरली आहे.

आजच मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर (रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल 36 वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान टाटाएस या खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून 06 किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाच्या अलिकडे असलेल्या छोट्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंगस्फोट घडविला.

स्फोटात 15 जवान शहीद झाले असून, खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे. वाहनाच्या चिंधड्या उडाल्या आहेत. घटनास्थळावर अजूनही पोलिसांची नक्षल्यांशी चकमक सुरु आहे.

Web Title: 15 soldiers martyred in blast Naxal Activity in Gadchiroli 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com