भारत खरेदी करणार 2700 कोटींची शस्त्रास्त्रे 

भारत खरेदी करणार 2700 कोटींची शस्त्रास्त्रे 

नवी दिल्ली : दहशतवादी हल्ले करून कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच धडा शिकविण्यासाठी भारताने आता एकामागून एक ठोस पावले उचलण्यास सुरवात केली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने आज तातडीने 2700 कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी दिली. 

बालाकोटमध्ये काल (मंगळवार) पहाटे भारतीय हवाई दलाने 'जैश ए महंमद'च्या प्रशिक्षण तळांवर हल्ला करून त्यांचे कंबरडे मोडले. यामुळे पाकिस्तानला दणका बसला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या हवाई दलाच्या विमानांनी आज भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केली. 

त्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री राजनाथसिंह, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह तीनही सैन्य दलांच्या प्रमुखांची आज बैठक झाली. या बैठकीस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि 'रॉ', 'आयबी' या गुप्तचर यंत्रणांचे प्रमुखही उपस्थित होते. त्यानंतर संरक्षण साहित्य खरेदीसंदर्भात महत्वाची बैठक झाली. 

या बैठकीमध्ये संरक्षण दलांसाठी 2700 कोटी रुपयांची तातडीची खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे. 

अग्नि हे भारताकडील सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. याची मारकक्षमता 5000 किमी एवढी आहे. भारताकडे 4426 रणगाडे आहेत तर पाकिस्तानकडे 2924 रणगाडे आहेत. भारताकडे 27 युद्धनौका तर पाकिस्तानकडे 11, भारताकडे 2100 तर पाकिस्तानकडे 950 लढाऊ विमाने आहेत.

Web Title: marathi news india to buy weapons worth 2700 crores 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com