कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय कोर्ट आज देणार निर्णय

कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय कोर्ट आज देणार निर्णय

हेग : कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) आज (बुधवार) निकाल देण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पथक येथे दाखल झाले आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ हे निकाल सुनाविणार आहेत.

पाकिस्तानचे ऍटर्नी जनरल अन्वर मन्सूर खान हे पाकच्या पथकाचे नेतृत्व करीत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते महंमद फैजल यांचाही या पथकात समावेश आहे. कुलभूषण (वय 48) यांच्यावर पाकिस्तानने हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांचे आरोप ठेवले असून, या प्रकरणी पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्यांना 11 एप्रिल 2017 रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठविली आहे.

कुलभूषण यांची मुक्तता करण्याची मागणी भारताकडून करण्यात आली आहे. मात्र, पाकिस्तानकडून त्यास विरोध करण्यात येत आहे. माजी भारतीय नौदल अधिकारी असलेल्या कुलभूषण यांच्यावर पाकिस्तानातील लष्करी न्यायालयाने दहशतवादी कारवायांचा ठपका ठेवत त्यांना शिक्षा ठोठावली होती. भारताने 2017 मध्ये याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. येथे न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल देत कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली होती. आता आज यावर अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.

Web Title: International Court of Justice to decide Kulbhushan Jadhavs fate

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com