शाहिद कपूर याच्या 'कबीर सिंह' चित्रपटाचे 'बेखयाली' हे गाणं प्रदर्शित

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 मे 2019

बॉलिवूड स्टार शाहिद कपूर लवकरच 'कबीर सिंह' या नवीन चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेतील विद्रोही रुप सोशल मिडीयावर चांगलेच पसंतीस पडते आहे. आता चित्रपटाचे 'बेखयाली' हे गाणं देखील प्रदर्शित झालं आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर लगेच ट्विटर ट्रेंडींगमध्ये आले आहे.

'बेखयाली' हे रोमँटीक गाणं शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्यावर चित्रीत केलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्येही 'बेखयाली'चे धृवपद वापरण्यात आले आहे. ट्रेलर बघितल्यानंतर या गाण्याची अनेकजणांना उत्सुकता होती. या गाण्यात कियारा आणि शाहिदचे एकमेकांवर खूप प्रेम असल्याचे दाखविले आहे. तरीही कियारा त्याला सोडून जाते, त्यानंतर पेशाने डॉक्टर असलेला शाहिद स्वतःच्या जीवाचे हाल करुन घेतो, दारूच्या नशेत तो रात्रंदिवस धूंद होतो.  

हे गाणं गायक सचेत टंडन यांनी गायले आहे. 'कबीर सिंह' हा चित्रपट साऊथ इंडियन चित्रपट 'अर्जून रेड्डी' चा हिंदी रिमेक आहे. संदीप वांगा यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 21 जूनला प्रदर्शित होईल. 

Web Title: Kabir Singh film song Bekhayali is released

संबंधित बातम्या

Saam TV Live