बेशिस्त रिक्षा चालकांचा कल्याण, टिटवाळा, आंबिवली, बल्यानी भागात सुळसुळाट

बेशिस्त रिक्षा चालकांचा कल्याण, टिटवाळा, आंबिवली, बल्यानी भागात सुळसुळाट

कल्याण - टिटवाळा, आंबिवली, बल्यानी, परिसरात अल्पवयीन विद्यार्थी, गर्दुल्ले, लायसन्स, बॅच नसलेले रिक्षा चालक प्रवासी वाहतुक करत असतात. यामुळे प्रवाश्याच्या जीवाशी खेळ सुरू असून, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्वरित कारवाई करावी अशी मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन अध्यक्ष आणि शिवसेना नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी कल्याण आरटीओ आणि पोलिसांकडे केली आहे. 

टिटवाळ्यामध्ये राज्यातील प्रसिद्ध गणपती देवस्थान असून आजूबाजूला लोकवस्ती वाढत आहे. या परिसरात प्रवासी वाहतूक करण्यासाठी रिक्षा एकमेव साधन असून, काही बेशिस्त रिक्षा चालक बेकायदेशीर रित्या प्रवाश्याकडून वाढीव भाडे घेतात. 

दरम्यान टिटवाळा रेल्वे स्थानकाबाहेर पडताना रेल्वे प्रवाश्याची घुसमट होते. कारण तेथे पुलाच्या आणि प्रवेश द्वारा जवळच रिक्षा लावलेल्या असतात. तसोच आंबिवली, आंबेडकर चौक, मांडा वाजपेयी चौक, नांदप, इंदिरानगर, आदी परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकामध्ये 

 इमानदारीने जे रिक्षा व्यवसाय करतात त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. दुसरीकडे प्रवासी वर्गासोबत होणारे वाद आणि अपघात टाळण्यासाठी त्वरित कारवाई करावी अशी मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन अध्यक्ष आणि शिवसेना नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी कल्याण आरटीओ आणि पोलिसांकडे केली आहे. 

टिटवाळा रेल्वे स्थानकात एकच अरूंद जुना पादाचारी पुल आहे. चतुर्थी किंवा दर मंगळवारी टिटवाळा स्थानकात दैनंदिन प्रवाशांसह भाविकांची गर्दी असेत. त्या चेंगराचेंगरीत रिक्षाचालक एफओबीच्या पाय-यांवर भाडे मिळविण्यासाठी गर्दी करतात. त्यात प्रामुख्याने वृद्ध, स्त्रिया व लहान मुले यांची मार्ग काढताना अक्षरशः दमछाक होते. 

बेकायदेशीर रिक्षा चालक, वाढीव भाडे, अल्पवयीन रिक्षा चालक बाबत तक्रार प्राप्त झाली असून, विशेष पथकामार्फत निश्चित कारवाई केली जाईल अशी माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली

Web Title: Unconditional rickshaw driver availed illegal travel by passengers

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com