पाकड्यांची झाली गळचेपी, निर्याती अभावी वाढली महागाई

 पाकड्यांची झाली गळचेपी,  निर्याती अभावी वाढली महागाई

कराचीः जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे 'जैशे महंमद'ने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास सुरवात केली आहे. याचाच परिणाम म्हणून आता पाकिस्तानमध्ये महागाई प्रचंड वाढू लागल्याने चांगले अन्न न मिळाल्याने 5 भावंडांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना दिली.

पोलिस अधीक्षक गुलशन ताहीर नुरानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सद्दर भागात असलेल्या एका हॉटेलमधील खराब अन्न खाल्यामुळे पाच भावंडांचा मृत्यू झाला आहे. दीड ते 10 वर्षे वयोगटातील ही मुले होती. मुलांच्या आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती गंभीर आहे.' पाकिस्तानमध्ये सध्या प्रंचड महागाई पसरल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना भाजीपाला खरेदी करणे परवडत नाही. प्रचंड महागाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

दरम्यान, लाहोरमध्ये टोमॅटो खरेदी करण्यासाठी एका किलोसाठी तब्बल 180 रुपये मोजावे लागत आहेत, इतर भाज्यांचे दरही कडाडले आहेत. भारतातील व्यापाऱ्यांनीही पाकिस्तानला होणारी निर्यात थांबविण्याचा निर्णय घेतला असून, रस्तेमार्गाने होणारी मालवाहतूक बहुतांशी ठप्प झाली आहे. मध्य प्रदेशमधील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा माल पाकिस्तानमध्ये न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाहोरमधील भाजी मंडईत याचा थेट परिणाम दिसत आहे. येथे टोमॅटो 180 रुपये किलो या भावाने विकला जात आहे. कांदा आणि बटाट्याचा भावही जवळपास दुप्पट झाला आहे. ढोबळी मिरची 80 रुपये किलो, तर भेंडी 120 रुपये किलो या दराने विकली जात आहे.

Web Title: 5 brother die after allegedly consuming food in Karachi at pakistan

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com