कर्नाटकच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं; 12 मे रोजी मतदान तर 15 मेरोजी मतमोजणी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 मार्च 2018

जातीय आणि धार्मिक मुद्द्यावरून ढवळून निघालेल्या कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं. कर्नाटकमधील निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार असून 12 मे रोजी मतदान होणार आहे आणि 15 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस आणि केंद्रातील सत्ताधारी भाजप या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.

जातीय आणि धार्मिक मुद्द्यावरून ढवळून निघालेल्या कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं. कर्नाटकमधील निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार असून 12 मे रोजी मतदान होणार आहे आणि 15 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस आणि केंद्रातील सत्ताधारी भाजप या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. भाजप काँग्रेसला आणखी एका राज्यातून हाकलण्यासाठी प्रयत्न करेल, तर काँग्रेस आपल्या हातात असलेलं एकमेव मोठं राज्य टिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागांसाठी मतदान होणार आहे. 4 कोटी 96 लाख मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील. मतदान EVM द्वारा होणार असून VVPAT प्रणालीचाही वापर करण्यात या निवडणुकांमध्ये करण्यात येईल. 

संबंधित बातम्या

Saam TV Live

ट्रेंडिंग