पुणे-बंगळुरु महामार्गावर खंडाळा घाटात भीषण अपघात; 18 मजुरांचा मृत्यू 

पुणे-बंगळुरु महामार्गावर खंडाळा घाटात भीषण अपघात; 18 मजुरांचा मृत्यू 

साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या टेम्पोला पुणे-बंगळुरु महामार्गावर खंडाळा घाटात भीषण अपघात झाला. यामध्ये तब्बल 18 मजुरांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या मजुरांमध्ये महिलांची संख्या जास्त असल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने टेम्पोमधून जवळपास 32 मजूर प्रवास करत होते. खंबाटकी बोगदा ओलांडून पुढे गेल्यानंतर नागमोडी वळणावर टेम्पोला अपघात झाला.
अपघातामध्ये तब्बल 18 मजुरांना प्राण गमवावे लागले असून 14 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघाताची भीषणता पाहून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com