सिंहगड घाटात दरड कोसळली

सिंहगड घाटात दरड कोसळली

रविवारी पहाटे चार वाजता सिंहगड घाटात दरड पडली. गडावरील शेवटच्या टप्प्यात असलेल्या परिसरात दरड पडली आहे. यामुळे घाट रस्ता बंद झाला आहे. पहाटेची वेळ असल्याने वाहतूक सुरू नसल्याने सुदैवाने कोणती दुर्घटना घडली नाही.


रात्रभर गडावर मूसळधार पावसाची संततधार होती. वाहनतळाच्या अलीकडे 500- 600 मीटरवर ही दरड पडली आहे. या दरडी छोटा भाग पडलेला आहे . मोठा भाग अद्याप पडलेला नाही. पावसाळा असल्याने गडावर मुक्कामी पर्यटक नव्हते. पहाटेची वेळ असल्याने मोठी दुर्घटना टळली. असे येथील ग्रामपंचायत सदस्य अमोल पढेर यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले.


या घाट रस्तात तीन वर्षांपूर्वी मोठी दरड पडली होती. त्याच्या जवळ ही दरड पडली आहे. दरड पडल्याचे कळताच वरिष्ठांना माहिती देऊन गडावर जाणारा रस्ता गोळेवाडी, व कोंढणपूर येथे बंद केले आहेत. असे वनरक्षक बाळासाहेब जीवडे यांनी सांगितले. 


मागील वर्षी देखील सुट्टी असताना दुपारच्या वेळी अशा प्रकारे दरड पडली होती. त्यावेळी, वन संरक्षण समितीच्या सुरक्षारक्षकांनी वेळीच दखल घेतल्याने त्यावेळी देखील मोठी दुर्घटना घडली आहे.


त्याचबरोबर, 8 व 9 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच सलग सहा दिवसापासून पाऊस पडत आहे. या भागातील पाऊस 350 ते 500 मिलिमीटरपर्यत गेला असल्याने दरडी पडण्याचा धोका आहे. असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे, घाट रस्ता वाहतुकीसाठी रविवारी बंद ठेवला होता. सोमवारी पाऊस जास्त असल्यास सोमवारी पण घाट बंद ठेवला जाईल. असे सहायक उप वनसंरक्षक महेश भावसार यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com