यांचेच खिसे फाटलेले, हे तुम्हाला काय देणार?: राज ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 12 मार्च 2018

मुंबई : "या सरकारच्या हातून तुमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत. तुम्ही माझ्याकडे वीस मागण्या केल्या आहेत. मीही तुमच्याकडे एक मागणी करतो. माझ्या हातात एकदा सत्ता देऊन पहा," असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमय्या मैदानावर शेतकरी मोर्चात सहभागी शेतकऱ्यांसमोर बोलताना केले .

राज ठाकरे म्हणाले, '"दुसऱ्यांच्या आंदोलनाला स्वत:चं आंदोलनं म्हणणं मला मान्य नाही. तेव्हा मी तुमचं दर्शन घ्यायला येथे आलो आहे. शेतकऱ्यांनो तुमच्या आंदोलनाला माझा आपला पूर्ण पाठिंबा आहे. कधीही हाक द्या मी मदतीस धावून येईन. या सरकारच्या हातून तुमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत. हे खोटे बोलणारे सरकार आहे. ते तुमच्या तोंडाला पाने पुसतील. हे सरकार तुमच्या मागण्या मान्यही करेल पण अंमलबजावणी होणार नाही. यांचेच खिसे फाटले आहेत, हे तुम्हाला काय देणार?"

राज ठाकरे पुढे म्हणाले," आज तुम्ही एवढे अंतर पायी चालून आला आहेत. तुम्ही आंदोलन करा. मोर्चे काढा. पण मोर्चात चालत असताना पायातलं रक्त विसरू नका. हे थापेबाज सरकार खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आले आहे.  तुमची किंमत फक्त निवडणुकीपुरतीच आहे. निवडणुकीच्या वेळी मात्र हा राग विसरू नका. तुमचा हा रागच तुमची लढाई तडीस नेईल."

संबंधित बातम्या

Saam TV Live

ट्रेंडिंग