'राज्यातील वंचितांची लोकसंख्या ४० टक्‍के, ही ताकद एकत्र येऊन प्रस्थापितांची सत्ता उलथवून लावेल' :  प्रकाश आंबेडकर 

 'राज्यातील वंचितांची लोकसंख्या ४० टक्‍के, ही ताकद एकत्र येऊन प्रस्थापितांची सत्ता उलथवून लावेल' :  प्रकाश आंबेडकर 

कोल्हापूर - ‘‘राज्यातील वंचितांची लोकसंख्या ४० टक्‍के इतकी आहे. ही ताकद एकत्र येऊन प्रस्थापितांची सत्ता उलथवून लावेल,’’ असा विश्‍वास वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्‍त केला. शिवाजी स्टेडियममध्ये आयोजित ‘सत्ता संपादन मेळाव्या’त ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत काँग्रेसची भूमिका काय, अशी विचारणाही त्यांनी केली. 

 आंबेडकर म्हणाले, ‘‘काँग्रेससोबत जागांची चर्चा झालीच नव्हती. आम्ही त्यांना संघाबाबतची भूमिका काय आहे, अशी विचारणा केली होती. काँग्रेस खरंच त्यांच्या विरोधात आहे का आणि असेल तर त्यांना कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी आराखडा द्यावा, अशी मागणी केली होती; मात्र काँग्रेसने याबाबत भूमिका स्पष्ट केली नाही. काँग्रेस तीन निवडणुकांमध्ये ज्या जागा हरली आहे आणि सध्या त्यांच्याकडे उमेदवार नाही अशा १२ जागांची मागणी केलेली आहे; मात्र ते चालढकल करीत आहेत. आता आम्ही दुधखुळे राहिलेलो नाही. आम्ही ज्या जागा जाहीर केल्या, तेथे आता तडजोड नाही.’’ उर्वरित जागांवर चर्चा करण्यास तयारी असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

राफेलवरून आंबेडकर यांनी केंद्र सरकारला टार्गेट केले. राफेल खरेदी करताना त्याबरोबरची सर्व हत्यारे देण्याची जबाबदारी संबंधित देशाची आहे. त्यांनी ती जबाबदारी घ्यायची असते; मात्र राफेल खरेदी करताना अशी जबाबदारी घेतली नसल्याचा आरोप त्यांनी मोदी सरकारवर केला. बोफोर्समध्ये लाचखोरी झाली; मात्र बोफोर्स देणाऱ्या देशाने या तोफांशी संबंधित सर्व साधनसामग्री दिली. त्यामुळेच कारगील युद्धातही बोफोर्स तोफा धडाडल्या, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

डागाळलेल्यांनी जपून बोलावे
 ‘‘काँग्रेसचे सर्व नेते भाजपसमोर म्याँव करत आहेत. म्याँवचा कधी वाघ होत नाही. ज्या दिवशी वाघ होतील, त्या दिवशी समुद्रकिनाऱ्याची बिल्डिंग बाहेर आल्याशिवाय राहणार नाही,’’ असा टोला त्यांनी ‘आदर्श’वरून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना लगावला.

आम्ही वंचित आघाडीत सर्व ‘क्‍लीन कॅरेक्‍टरवाले’ आहोत. आमच्यासमोर मोदीसुद्धा उभा राहणार नाही. काँग्रेसवाले डागाळलेले आहेत. त्यामुळेच ते जपून बोलत आहेत. चुकूनही भाजपविरोधात बोलण्याचा ते प्रयत्न करत नाहीत. त्यांच्यात आता अगोदर चिदंबरम आत जाणार की इतर कोण, याची धास्ती लागल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Web Title: 40 percent of the population in the state, the strength will come together and overthrow the power of the presidents : Prakash Ambedkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com