मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून 10 महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर - मराठा समाजाला आरक्षणा संदर्भात उद्या (ता.26) मुंबईत गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या सकल मराठा समाजाचे कार्यकर्त्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत आणि हर्षल सुर्वे यांचा समावेश आहे.  पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी हलविण्यात आले

सकल मराठा समाजातर्फे सोमवारी (ता..26) मुंबईत गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात यासाठी गेली अनेक दिवसापासून जय्यत तयारी सुरू आहे. नियोजनाच्या विविध बैठकाही घेण्यात आल्या. आज दुपारी दसरा चौकात मुंबईला मोर्चाला जाण्याची तयारी वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वेसह कार्यकर्ते करत होते. याठिकाणी पोलिस दाखल झाले. त्यांनी त्यांना विनंती करून गाडीत बसवले. त्यानंतर त्यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आले. येथे त्यांच्याशी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी चर्चा केली.

यावेळी अपर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, गृह-पोलिस उपअधीक्षक सतिश माने, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे, लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर आदी उपस्थित होते. चर्चेनंतर त्यांना पोलिस व्हॅनमधून अज्ञातस्थळी हलविण्यात आले. त्यावेळी त्यांनी एक-मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. 

दरम्यान सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दसरा चाैक येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्या समोर आंदोलन सुरू केले आहे. अटक केलेल्या कार्यकर्यांना सोडत नाहीत तोपर्येत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

WebTitle : marathi news kolhapur maratha reservation maratha kranti karyakartas under arrest 

संबंधित बातम्या

Saam TV Live