वडाळ्यात जमीन खचली; खचलेल्या जमिनीमुळे रहिवाशांच्या जीवाला धोका

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 जून 2018

वडाळ्यात असलेल्या विद्यालंकार कॉलेजजवळील इमारतीची जमीन खचली असून लगतची कंपाऊंड वॉल कोसळली आहे. या दुर्घटनेत लॉएड इस्टेट इमारतीतील रहिवाशांच्या काही कार्सचा चक्काचूरही झालाय. दरम्यान घडलेल्या घटनेमुळे इमारतीतील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 

या इमारती शेजारी सुरू असलेल्या दोस्ती बिल्डिंग्च्या बांधकामामुळेच जमीन खचल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळताच, फायरब्रिगेडने घटनास्थळी धाव घेतली असून इमारतीतील रहिवाशांना इतरत्र हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, मुंबईतल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच चांगलीच त्रेधा उडालीये. मुंबईत ठिकठिकाणी भिंती कोसळण्याच्या घटना घडल्यात, तर काही ठिकाणी जमीन खचण्याच्याही घटना घडल्या आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live