स्मृती ईराणी ठरल्या जायंट किलर; राहुल गांधींना चारली पराभवाची धूळ

स्मृती ईराणी ठरल्या जायंट किलर; राहुल गांधींना चारली पराभवाची धूळ

उत्तर प्रदेशातलं अमेठी आणि गांधी कुटुंबातील व्यक्तीचा विजय हे आतापर्यंतच ठरलेलं समीकरण. मात्र, यावेळी काँग्रेसच्या पारंपरिक मतदार संघ अमेठीत भाजपचं कमळ फुललंय. गेल्या वेळच्या पराभवाची सव्याज परतफेड करत भाजपच्या स्मृती इराणींनी राहुल गांधींचा पराभव केलाय.

निवडणूक प्रचार सुरुवातीपासूनच स्मृती ईराणी आघाडी घेतली होती...प्रचारासाठी त्या अमेठीत तळ ठोकून बसल्या होत्या. अमेठीतला पराभव राहुल गांधींनी स्वीकारलाय. राहुल गांधींनी या विजयासाठी स्मृती ईराणींना शुभेच्छा दिल्यात. 

अमेठी आतापर्यंत गांधी कुटुंबाचा पारंपरिक मतदार संघ राहिलाय. 1980 मध्ये संजय गांधी या मतदार संघातून निवडून आले. त्यांच्या मृत्यूनंतर राजीव  गांधींनी 1981 से 1991 पर्यंत या मतदार संघाचं नेतृत्व केलं. त्यानंतर 1999 ते 2004 सोनिया गांधी अमेठीच्या खासदार होत्या. 2014 पासून आतापर्यंत राहुल गांधी अमेठीचं नेतृत्व करत होते. टीव्ही कलाकार अशी ओळख असलेल्या स्मृती ईराणी यांनी 2003मध्ये भाजपात प्रवेश केला. 2004 मध्ये त्यांनी चांदनी चौक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. तेव्हा काँग्रेसच्या कपिल सिब्बल यांनी त्यांचा पराभव केला. २०११ मध्ये त्यांना भाजपने राज्यसभेवर पाठवलं. २०१४मध्ये त्यांनी पहिल्यांदा अमेठीमधून निवडणूक लढवली. मात्र त्यावेळी त्यांचा राहुल गांधींनी पराभव केला होता. निवडणुकीत पराभव झाला तरीही त्यांचं राजकीय वजन वाढलं. मोदींनी त्यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं

अख्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या लढतीत स्मृती इराणींनी बाजी मारलीय. राहुल गांधींना पराभवाची धूळ चारणाऱ्या स्मृती ईराणींचं राजकीय वजन वाढलंय.

WebTitle : marathi news loksabha 2019 results smruti irani turned to be an giant killer 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com