राणे पुत्राला जोरदार झटका; राणेंचे कोकणातील संस्थान खालसा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

अगोदर शिवसेना, मग काँग्रेस आणि अखेर स्वत:चा पक्ष स्थापन करत राजकीय वाटचाल सुरू असलेल्या राणे पितापुत्रांना पुन्हा एकदा जोरदार झटका बसला आहे. कोकणातील रत्नागिरी-सिधुदुर्ग मतदारसंघातून राणे पुत्राला सलग दुसऱ्या पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. या पराभवाने एकेकाळी कोकणात एकहाती वर्चस्व असलेल्या नारायण राणेंचे संस्थान खालसा झाल्याचे बोलले जात आहे. 

एकिकडे नारायण राणे आपला कोकणातील प्रभाव गमावत असतानाच शिवसेना मात्र कोकणात हळुहळू आपली ताकद वाढवताना दिसतेय. दोन लाखांच्या मताधिक्क्याने राऊतांनी ही जागा राखली आहे.  

लोकसभेच्या पराभवानंतर नारायण राणेंकडे आता आपले राजकीय अस्तित्व टीकवण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुक ही अखेरची संधी आहे. मात्र २०१४ च्य़ा निवडणुकीत खुद्द राणेंना कुडाळ मतदारसंघातून विधानसभेत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे विधानसभेचे आव्हानही राणेंसाठी निश्चितच सोपे नसेल.

WebTitle : marathi news loksabha election 2019 results shivsena won in konkan

संबंधित बातम्या

Saam TV Live