द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचं निधन 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे आज (मंगळवार) चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते कावेरी रुग्णालयात उपचार घेत होते. आज त्यांचे निधन झाले.

द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे आज (मंगळवार) चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते कावेरी रुग्णालयात उपचार घेत होते. आज त्यांचे निधन झाले.

चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात गेल्या दहा दिवसांपासून 94 वर्षीय करुणानिधी यांच्यावर उपचार सुरु होते. रक्तदाब जाणवू लागल्याने त्यांना 28 जुलैला कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्रकृती आणखीनच खालावली होती. करुणानिधी यांच्या निधनाने राष्ट्रीय राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे.

दरम्यान, करुणानिधी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अन्य काही नेत्यांनी भेट घेतली होती. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांची भेट घेतली होती.


संबंधित बातम्या

Saam TV Live