काकासाहेब शिंदेच्या जलसमाधीचे महाराष्ट्रभरातील पडसाद

काकासाहेब शिंदेच्या जलसमाधीचे महाराष्ट्रभरातील पडसाद

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान मोर्चेकरी काकासाहेब शिंदेने आत्महत्या केली. याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.

कामोठेत महामार्गावर जाळले टायर्स

रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मराठा समाजाच्या मोर्चेकरांनी कामोठेतील पनवेल-सायन महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी मुंबईच्या दिशेने जाणारे वाहने अडवली. तसंच महामार्गावर टायर जाळून शासनाचा निषेध नोंदवला. त्यामुळे, काही प्रमाणात वाहनांना अडथळा निर्माण झाला. दरम्यान पोलिसांनी त्वरित आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आंदोलनकर्त्यांना बाहेर काढले.

औरंगाबादमध्ये कडकडीत बंद

महाराष्ट्र बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी नगरहून औरंगाबादकडे जाणारा मार्ग बंद केलाय. दरम्यान  आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचाही पुर्नउच्चर आंदोलकांनी केलाय. 

बंदचे पडसाद यवतमाळ मध्येही 

मराठा आरक्षणासाठी महराष्ट्रात पुकारलेल्या बंदचे पडसाद यवतमाळ येथेही दिसत आहेत. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसटीने आपल्या फेऱ्या सकाळी 7 वाजता पुढील आदेश येइपर्यंत बंद केल्यात. प्रवाशांना अचानक फेऱ्या रद्द झाल्याने एसटीत बसलेलेल्या प्रवाशांना खाली उतरावे लागले त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होते आहे.

कोल्हापूरच्या दसरा चौकात ठिय्या आंदोलन

मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी आज कोल्हापूरच्या दसरा चौकात ठिय्या आंदोलन होत आहे. यासाठी दसरा चौकात जय्यत तयारी करण्यात आली आहे. याठिकाणी सकाळपासूनच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात आंदोलक सहभागी झालेत. 

पंढरपुरात एसटीची सेवा काही प्रमाणात सुरू 

मराठा आरक्षण मागणीसाठी साठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात एसटीची सेवा काही प्रमाणात सुरू ठेवण्यात आली आहे. दरम्यान मराठवाडा आणि विदर्भातील एसटीची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. 

WebTitle : marathi news maharashtra bandha reservation maratha reservation 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com