राज्यातील 26 जिल्ह्यांतील 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर

राज्यातील 26 जिल्ह्यांतील 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर

मुंबई : राज्य सरकारकडून राज्यातील 26 जिल्ह्यांतील 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 112 तालुक्यांत गंभीर तर 39 तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे.

राज्यातील 151 तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. गंभीर दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये करमाळा, माढा, खानापूर, विटा, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोले, जत, कवठेमहंकाळ, आटपाडी, तासगाव, माळशिरास, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सातारा माण-दहिवडी यांसह अनेक तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या तालुक्यांतील परिस्थिती अत्यंत कठीण आहे. याशिवाय 39 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे. 

दरम्यान,  राज्यातील बहुतांश जिल्ह्यात परतीच्या पावसाने तोंड फिरवले होते. त्यामुळे राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे विरोधकांकडूनही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यानंतर आता राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

WebTitle : marathi news maharashtra government declared drought in 151 talukas of maharashtra  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com