राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाची दमदार हजेरी.. 

राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाची दमदार हजेरी.. 

राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे सर्वाधिक २८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सोमवारपर्यंत उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

मध्यप्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरातेत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टी भागात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

WebTitle : marathi news maharashtra heavy rain monsoon farming floods

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com