दुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याची घोषणा; दूध दराच्या मुद्यावर अखेर तोडगा
दूध दराच्या मुद्यावर अखेर तोडगा निघालाय. दुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याची घोषणा गुरुवारी सरकारतर्फे करण्यात आली. नागपुरात विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत संबंधित निर्णय घेण्यात आला.
21 जुलैपासून हा निर्णय लागू होणार असून, दूध संघांना आता शेतक-यांना 25 रुपये भाव द्यावा लागणार आहे. राज्य सरकार हे पाच रुपये दूध संघांना देईल आणि दूध संघांकडून हे पाच रुपये शेतकऱ्यांना मिळतील.

दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधानपरिषदेत तशी घोषणा केली. दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी, यासाठी राजू शेट्टींच्या 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'ने राज्यभरात आंदोलन सुरु केले होते.