राज्यात पावसाचा जोर कायम; जाणून घ्या पावसाची खबरबात.. 

राज्यात पावसाचा जोर कायम; जाणून घ्या पावसाची खबरबात.. 

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजिवन विस्कळीत झालंय. येत्या 48 तासात उत्तर कोकण, मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय. तसंच आज समुद्र किनारी 4.4 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिलाय.

गेल्या महिन्याभरापासून रुसून बसलेला मॉन्सून अखेर चांगलाच सक्रिय झाला. शुक्रवार पाठोपाठ शनिवारीही पावसाने दमदार बॅटींग केली. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई उपनगरांसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत जून महिन्यातील सरासरी गाठली गेली. येत्या पाच दिवसांमध्ये कर्नाटकची किनारपट्टी, कोकण, गोवा तसेच ओडिशा आणि छत्तीसगड येथे सर्वदूर पाऊस पडू शकतो. या काळात महाराष्ट्रात सरासरी किंवा त्याहून अधिक पाऊस पडू शकतो.

4 ते 10 जुलैदरम्यान राज्याच्या किनारपट्टीवर ही स्थिती कायम राहू शकते. विदर्भातही आजपासून सर्वदूर पावसाची शक्यता आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तीव्र कमीदाबाचा पट्टा निर्माण झाला असून मंगळवारी विदर्भातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिलाय. 

WebTitle : marathi news maharashtra monsoon updates

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com