सेनेचं भाजपावर रामबाणअस्त्र..  

सेनेचं भाजपावर रामबाणअस्त्र..  

लोकसभा निवडणुकीत गळ्यात गळे घालून सेना-भाजपचे नेते एकत्र लढले असले तरी दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा कुरबुरी सुरू झाल्या आहेत. भावी मुख्यमंत्री भाजपचाच असेल ही अमित शहांची भूमिका शिवसेनेला खटकलीय. यालाच प्रत्युत्तर म्हणून शिवसेना पुन्हा एकदा रामाबाण हाती घेणारंय.

16 जूनला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या खासदारांसह अयोध्येला जाणार आहेत. तिथं ते रामलल्लाचं दर्शन घेतली. शिवाय मंदिराच्या प्रश्नावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चाही करतील. हे सगळं भाजपवर दबावतंत्र असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरूंय. 

लोकसभेसाठी युती होण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी अयोध्येत जाऊन भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आमच्यात सारं काही आलबेल आहे असं सांगत दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवली. पण आता पुन्हा एकदा राम मंदिराच्या प्रश्नावरून दोन्ही पक्षांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. 

WebTitle : marathi news maharashtra shivsena BJP political conflicts over CM of maharashtra

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com