एसटी संप : राज्यभरातील 1 हजार 148 कर्मचाऱ्यांवर कारवाई
पगारवाढीसह इतर मागण्यांवरुन 8 जूनपासून संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर,10 दिवसांनंतर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 8 आणि 9 जून रोजी एसटी संपात विठ्ठलवाडी डेपोतील 10 कर्मचाऱ्यांसह राज्यभरातील 1 हजार 148 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे.

निलंबित करण्यात आलेले सर्व कर्मचारी हे एसटीच्या पेरोलवर आहेत. दरम्यान संपाचं आवाहन करण्यात आलं होतं त्याचवेळी एसटी प्रशासनाने संपात सहभागी होणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसारच ही कारवाई करण्यात आली आहे. नवीनच भरती झालेल्या या सर्व 1 हजार 148 जणांना कायमस्वरूपी बडतर्फ केल्यानं कामगारांमध्ये रोषाचं वातावरण आहे.