धोनीला शिकवायची गरज नाही : विराट कोहली

धोनीला शिकवायची गरज नाही : विराट कोहली

मॅंचेस्टर : मधल्या फळीत काय करायचं हे धोनीला तुम्ही सांगू नका ते त्याला चांगलंच कळतं अशा शब्दांत भारताचा कर्णधार विराट कोहलीने धोनीवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. 

वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने 125 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणइ उपांत्यफेरीतील प्रवेश निश्चित केला. या सामन्यातही धोनीने सुरवातीला संथ खेळ केला मात्र, अखेरच्या षटकात त्याने ओश्ने थॉमसला दोन षटकार आणि एक चौकार मारला ज्यामुळे भारताला 268 धावांचा टप्पा गाठता आला. 

सामन्यानंतर धोनीच्या या खेळीबद्दल विचारले असता कोहलीने धोनीची बाजू घेत टीकाकारांना दूषणे दिली. तो म्हणाला ''मधल्या फळीत काय करायचे हे धोनीला चांगले माहित आहे. एक दिवस तो खेळला नाही की लगेच सगळे त्याच्यावर टीका करतात. मात्र, आमचा नेहमीच त्याला पाठींबा राहिल, त्याने यापूर्वी भारतासाठी अनेकवेळा सामन्यात विजय मिळवून दिला आहे. जेव्हा संघाला जादाच्या 15-20 धावा हव्या असतात, तेव्हा त्या कशा करायचे हे त्याला बरोबर ठाऊक असते. तो क्रिकेटचा लिजंड आहे आणि नेहमी राहिल.'' 

Web Title: Virat Kohli praises M S Dhoni after clash against West Indies

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com