मंत्रालयात 'उंदीर' घोटाळा; खडसेंनी केली पोलखोल  

मंत्रालयात 'उंदीर' घोटाळा; खडसेंनी केली पोलखोल  

एकनाथ खडसे यांनी मंत्रालयात एक मोठा उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. मंत्रालयात 3 लाख 19 हजार 400 उंदीर झाले होते. ते मारण्याचं कॉन्ट्रेक्ट एका कंपनिला देण्यात आलं. 6 महिन्यांत सर्व उंदरांचं निर्मूलन करण्याचं ठरलं होतं, मात्र अवघ्या 7 दिवसांतच सर्व उंदीर मारले असल्याचं सांगण्यात आलंय. त्यानुसार दिवसाला सरासरी 45 हजार उंदीर मारल्याचं सांगितलं. मात्र या उंदरांची विल्हेवाट कशी आणि कुठे लावली याची काही माहिती दिली नाही. त्या कंपनीकडे विष हाताळन्याचं लायसन्सही नव्हतं. मंत्रलायत विष आणण्यास परवानगी नाही. धर्मा पाटिल यांनी बाहेरुन विष आणलं नव्हतं. ते त्यांनी मंत्रलयात असलेलं उंदीर मारण्याचं विष घेतलं आणि प्राशन केलं. हा खुप मोठा घोटाळा आहे याची चौकशी करा असं खडसेंनी म्हंटलंय. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com