मराठा समाजाला महाराष्ट्रात 16% आरक्षण ; आरक्षणाचं विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर

मराठा समाजाला महाराष्ट्रात 16% आरक्षण ; आरक्षणाचं विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर

मुंबई : मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयकास आज (गुरुवार) विधानसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. हे आरक्षण मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षीय आमदारांचे आभार मानले. 

मूळ आरक्षणाला धक्का न लावता सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) अंतर्गत राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद देण्याची शिफारस मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या कृती आराखड्यात करण्यात आली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज हा आराखडा सभागृहात सादर केला. त्यानंतर आरक्षणासाठी विधेयकही मांडले. 

यावर झालेल्या चर्चेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विधेयकास एकमताने पाठिंबा दिला. 'या विधेयकास पूर्ण पाठिंबा आणि सरकारला समर्थन आहे', असे विधान विखे पाटील यांनी केले. आवाजी मतदानामध्ये सभागृहाने या विधेयकास एकमताने पाठिंबा दिला. विधान परिषदेमध्येतही या आरक्षणास मंजुरी देण्यात आली.

राज्यात सध्या लागू असलेल्या विद्यमान 52 टक्के आरक्षणास धक्का न लावता त्यात वाढ करण्यासाठी ते उन्नत आणि प्रगत गटातील नाहीत, केवळ अशा व्यक्तींनाच 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून आरक्षणाच्या टक्केवारीसाठी तरतूद करणे इष्ट वाटते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अशा प्रवर्गासाठी 16 टक्के आरक्षणाची तरतूद करणे योग्य वाटते, असेही ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. 

मराठा आरक्षणाचे विधेयक सभागृहात सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर हे विधेयक सभागृहात मांडण्यात आले. या विधेयकास मंजुरी मिळाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. दुसरीकडे, मराठा क्रांती मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी या आरक्षणाविषयी शंका उपस्थित केली आहे.

WebTitle : marathi news maratha reservation bill passed in both the houses unanimously 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com