महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य : मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील सीबीएससी, आयसीएसई आणि सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे बंधनकारक करणार असून, त्यासाठी कठोर कायदा केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली.

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे सक्तीचे करावे या मागणीसाठी काही प्रमुख साहित्यिक मुंबईत आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत या पार्श्वभूमीवर शिबसेनेच्या निलम गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता . येत्या सोमवारी होणाऱ्या धरणे आंदोलनात लक्ष्मीकांत देशमुख, अरुणा ढेरे आदी उपस्थित राहणार आहेत. 

इतर राज्यात तिथली भाषा अनिवार्य आहे यासंदर्भात त्या त्या राज्यात असलेला कायद्याबाबतची माहिती या साहित्यिकांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिली आहे असे गोऱ्हे यांनी सांगितले. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. साहित्यिकांच्या शिष्टमंडळाला आपण भेटीसाठी वेळ देणार आहोत आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्याकडे जबाबदारी देणार असल्याची माहिती मुखमंत्री फडणवीस यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: marathi news marathi is must in all the schools of maharashtra CM fadanvis 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com