लाल नाही,तर निळा पण कुठलाही तरी दिवा द्या

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 जून 2019

पिंपरी : लाल नाही,तर निळा पण कुठलाही तरी दिवा द्या, अशी आर्त मागणी 19 व्या महापौर परिषदेत राज्यातील 16 महापौरांनी केली. त्याला पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांनी दुजोरा दिला. कुठलेही अधिकार नसल्याने आपले पद हे निव्वळ शोभेचे बाहुले असल्याची भावनाही या महापौर परिषदेत व्यक्‍त केरण्यात आली. पेन्शन मिळण्याच्या 33 वर्षाच्या जुन्या मागणीचा ठराव यावेळी पुन्हा करण्यात आला.

रविवारी (ता.9) लोणावळा येथे ही परिषद झाली. मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर अध्यक्षस्थानी होते. कोल्हापूर वगळता इतर 16 महापालिकांचे महापौर यावेळी उपस्थित होते. मोटारीवरील लाल दिवा काढण्याचा निर्णय झाला. त्यात महापौरांचाही दिवा निघाला आहे. फक्त मुंबईचे महापौर त्याला अपवाद आहेत. त्यांना अंबर दिवा अजून आहे. तसेच त्यांच्या गाडीमागे 'एस्कॉर्ट'ही आहे. त्यामुळे लाल गेला, आता निळा वा कुठलाही दिवा द्या, अशी मागणी सर्वच महापौरांनी महापौर परिषदेत केल्याचे जाधव यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. पुढील महापौर परिषद ऑगस्टमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये घेणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याकरिता आमंत्रित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.त्यातून प्रशासकीय व आर्थिक अधिकार मिळणे,पेन्शन मिळणे या मुख्य मागण्या मार्गी लागतील,असा कयास वर्तविण्यात आला आहे.

ज्ञानेश्‍वर लांडगे हे पिंपरी-चिंचवडचे महापौर असताना महापौरांना पेन्शन द्यावे,अशी मागणी 33 वर्षापूर्वी करण्यात आलेली आहे. ती यावेळी पुन्हा केली गेली. मात्र,ते कुणी द्यायचे यावरून राज्य सरकार आणि पालिका यांच्यात तू,तू,मैं,मैं होण्याची शक्‍यता असल्याने ही मागणी मान्य होणे कठीण असल्याचे या परिषदेला उपस्थित असलेल्या एका महापौरांनीच सांगितले. महापौरांचा आरोग्यनिधी (वैद्यकीय मदतीचा) प्रत्येक रुग्णामागे पाच हजारांवरून पंचवीस हजार करावा,असाही ठराव या परिषदेत करण्यात आला.

संबंधित बातम्या

Saam TV Live