वाशीतल्या MGM रुग्णालयातल्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला
नवी मुंबईच्या वाशी येथील एमजीएम रुग्णालयातल्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. हॅकर्सने तिथली संगणकीय यंत्रणा ठप्प करून बिट कॉइन स्वरूपात खंडणीची मागणी केली आहे.
याकरिता त्याने स्वत:चा ईमेल आयडीही दिलेला आहे, त्यानुसार रुग्णालयाच्या वतीने गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे तक्रार देण्यात आलेली आहे.
हॅकरने खंडणीच्या रकमेचा उल्लेख केलेला नसून केवळ बिट कॉइन स्वरूपात खंडणीची मागणी केलेली आहे, त्याकरिता संपर्कासाठी दिलेल्या ईमेल आयडीच्या आधारे हॅकरचा शोध सुरू आहे.

WebTitle : marathi news MGM hospital vashi cyber attack bitcoin