दूध आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरु; महाराष्ट्रातली दूध आंदोलनाची परिस्थिती

 दूध आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरु; महाराष्ट्रातली दूध आंदोलनाची परिस्थिती

सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरु आहे. सांगलीमध्ये दूध आंदोलन हिंसक वळण लागले आहे. सांगलीच्या विश्रामबागमध्ये दुधाच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. तर तासगावमध्ये दूध घेऊन जाणाऱ्या गाडीतले दूध रस्त्यावर ओतण्यात आले. दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे.

मुंबईत दूध संपाचा परिणाम होण्याची शक्यता 
मुंबईमध्ये दुधाचा तुटवडा जाणवला नसला तरी ठाण्यात मात्र दूध संपाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यात सुरू असलेल्या संपामुळे ठाण्यात देखील 2 दिवसांत दुधाची टंचाई जाणवण्याची शक्यताय. ठाण्यात सांगली, सातारा, मंचर, वाशी या ठिकाणाहून दूध येतं त्यामुळे ठाणेकरांना दूध टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यताय. 

कोल्हापूरमध्ये दूध दरवाढ आंदोलन चांगलंच पेटलं 
कोल्हापूरमध्ये दूध दरवाढ आंदोलन चांगलंच पेटलं असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाचा टँकरच पेटवून दिला. जयसिंगपूर रेल्वे स्टेशनजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोकुळ दूध संघाचा टँकर पेटवला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

पुण्यात आंदोलनाचा परिणाम नाही 
पुण्यात आंदोलनाचा परिणाम पाहायला मिळाला नाही. मात्र, दोन दिवसांनी तुटवडा जाणवू शकतो असं दूध वितरकांचं म्हणणं आहे. पुण्यात चितळेंकडे दुधाच्या गाड्या आल्या असून, खाजगी वितरकांकडे नेहमीप्रमाणे दुधाचे वितरण सुरू आहे. 

औरंगाबाद-जालना रोडवर दुधाचा टँकर अडवला 
दूध दरवाढीच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेत आक्रमक झालेत. औरंगाबाद-जालना रोडवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडू दुधाचा टँकर अडवण्यात आला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी टँकरमधील 4 हजार लिटर दूध रस्त्यावर ओतून दिलं..यावेळी त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली..

नाशिकमध्ये दूध दरवाढ आंदोलनाचा परिणाम
राज्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दूध संपामुळे नाशिकमध्ये देखील परिणाम जाणवू लागला आहे. शिर्डी, कोपरगाव, इथल्या दूध डेरींना नाशिकमधील दूध पाठवण्यास उत्पादक नकार देत आहेत. नुकसान होण्याच्या भितीमुळे उत्पादक दूध पाठवण्याचे टाळत आहेत आणि याचा परिणाम आता दुधाच्या भावावर झाल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकमध्ये दुधाचे दर प्रतिलिटर 5 रुपयांनी पडले असून दूध उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com