वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावाला निषेध नोंदवणाऱ्या MIMच्या नगरसेवकाला चोप

वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावाला निषेध नोंदवणाऱ्या MIMच्या नगरसेवकाला चोप

अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत निषेध नोंदवला गेला. निषेध नोंदवणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना भाजपच्या नगरसेवकांनी अक्षराक्षः चपलेने चोप दिलाय.

समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विषय महापौरांनी घेतला.

वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रफित सभागृह दाखविण्यात आली. त्यानंतर एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी श्रद्धांजली अर्पण करण्याच्या ठरावाचा निषेध केला. त्यामुळे भाजपचे सदस्य संतप्त झाले.

प्रमोद राठोड, राज वानखेडे, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे यांनी मतीन यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना  अक्षरक्षः खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. माधुरी अदंवत यांनी चपलेने मारले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com