चिनी हॅकर्सकडून संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक ?

चिनी हॅकर्सकडून संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक ?

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक झाल्याचे आज (शुक्रवारी) स्पष्ट झाले. या प्रकरणी योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांनी ट्विटरवरून दिली. तसेच भविष्यात असे अनुचित प्रकार घडू नयेत यासाठीही काही उपाययोजना करण्यात येतील, असे सितारमण यांनी स्पष्ट केले. 

संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर युजर्सला 'एरर मेसेज' दिसत आहे. या 'एरर मेसेज'बरोबर 'ट्राय अगेन लेटर' असा संदेशही झळकत आहे. या संदेशाबरोबरच चिनी भाषेतील एक विशिष्ट अक्षर वेबसाईटच्या पानावर दिसते. या अक्षराचा अर्थ 'होम' असा असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळाची जबाबदारी ही नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटरकडे (एनआयसी) आहे. संकेतस्थळ पूर्ववत करण्यासाठी 'एनआयसी'च्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे संरक्षण खात्यातील अधिकाऱयांनी सांगितले. वेबसाईट हॅक करण्यामागे चिनी हॅकर्स सामील असू शकतात, असा अंदाज संरक्षण अधिकाऱयांनी व्यक्त केल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. 

दरम्यान, अत्यंत महत्वाचे खाते असलेल्या खुद्द संरक्षण मंत्रालयाचीच वेबसाईट हॅक झाल्याने सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com