अविवाहित मुलींना यापुढे मोबाईल बंदी; मोबाईल वापरताना मुलगी सापडल्यास पालकांवर कारवाई

अविवाहित मुलींना यापुढे मोबाईल बंदी; मोबाईल वापरताना मुलगी सापडल्यास पालकांवर कारवाई
  • अविवाहित मुलींना यापुढे मोबाईल बंदी
  • मोबाईल वापरताना मुलगी सापडल्यास पालकांवर कारवाई
  • आंतरजातीय विवाह केल्यास दीड ते दोन लाखांचाही दंड

धक्का बसला ना.. पण हे घडलंय.. कुठे घडलंय ठावूक आहे का.. ज्या गुजरातचं विकासाचं मॉडेल देशासमोर सतत ठेवलं जातं त्या गुजरातमध्ये.

गुजरातमधल्या बनासकांठा जिल्ह्यात ठाकोर समुदायातल्या अविवाहित मुलींना मोबाईल बंदी करणारा फतवा जारी करण्यात आलाय. एकीकडे मुलींना समानतेचा दर्जा दिल्याच्या बाता मारातच्या आणि दुसरीकडे त्यांच्यावर अशी बंधन लादायची, हा प्रकारच संतापजनक असल्याची प्रतिक्रिया आता उमटू लागलीय.

दांतीवाडा तालुक्यातल्या 12 गावांमधल्या ठाकोर समुदायासाठी हा फतवा बंधनकारक करण्यात आलाय. संतापजनक बाब म्हणजे इथल्या काँग्रेस आमदार गनिबेन ठाकोर यांनी चक्क या निर्णयाचं समर्थन केलंय. मुलींवरची मोबाईल फोन बंदी चुकीची नाही. त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, अशी मल्लिनाथी त्यांनी केलीय.

या बैठकीत आणखी एक विचित्र फतवा जारी करण्यात आलाय. हा फतवा आहे आंतरजातीय विवाहाविरोधातला. ठाकोर समुदायातल्या मुलींनी बाहेरच्या जातीत लग्न केलं, तर त्यांच्या पालकांना दीड लाख रुपये दंड होईल. तर मुलानं आंतरजातीय लग्न केलं तर त्याच्या पालकांना 2 लाख रुपये दंड केला जाईल. मुलींवर अन्याय करणाऱ्या, त्यांना सापत्न वागणूक देणाऱ्या या फतव्याचा निषेध करावा तितका कमीच.

WebTitle : MARATHI NEWS mobile ban for unmarried girls

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com