मोदी-जिनपिंगमध्ये डोकलामच्या मुद्द्यावर चर्चा नाहीच;  मोदी-जिनपिंग भेटीचं फलित काय ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 एप्रिल 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. दोन दिवसांच्या चीन दौऱ्यात मोदींचा खास पाहुणचार करण्यात आला. त्यांच्यासाठी चक्क हिंदी गाणं वाजवण्यात आलं. इतकंच नाही तर मोदी आणि जिनपिंग यांनी एकत्र नौकाविहारही केला. दोन दिवसांत तब्बल सहा वेळा मोदी आणि जिनपिंग यांच्यात बैठक झाली. मात्र या बैठकीत वादग्रस्त असलेल्या डोकलाम आणि चीन - पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर संदर्भात थेट चर्चा करणं दोन्ही नेत्यांनी टाळलं. दहशतवादापासून ते आर्थिक संबंध वाढवण्यापर्यंत इतर महत्त्वाच्या विषयांवर उभय नेत्यांत चर्चा झाली. 

या बैठकीत सीमेवरील वाढत्या तणावावरही चर्चा झाली. सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी दोन्ही नेत्यांत सहमती झाली. दोन्हीकडच्या लष्कराला स्ट्रॅ्टेजिक गाइडन्स देण्यावरही मतैक्य झालं. व्यापारवृद्धी, संस्कृती, पीपल टू पीपल रिलेशन मजबूत करण्यावरही या बैठकीत भर देण्यात आला. इतकंच नाही तर हिंदी चित्रपट चीनमध्ये आणि चिनी चित्रपट भारतात दाखवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या दौऱ्यामुळे भारत आणि चीनमधील संबंध दृढ व्हायला मदत होईल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासकांनी व्यक्त केलाय. 

एकंदरीतच, मोदी-जिनपिंग यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा हिंदी चिनी भाई भाईचा नारा देण्यात आलाय. मात्र, असं असलं तरी अत्यंत महत्त्वाच्या या भेटीत दोन्ही देशांच्या प्रमुखांनी डोकलामसारख्या मुद्द्यावर मौन का बाळगलं याचं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. 

संबंधित बातम्या