पावसाळ्यातही बहरलंय महाबळेश्वर

पावसाळ्यातही बहरलंय महाबळेश्वर

सिझन कुठलाही असो नेहमीच पर्यटकांनी गजबजलेलं पर्यटनस्थळ म्हणजे महाबळेश्वर. पावसाळ्यातही महाबळेश्वर पर्यटकांनी बहरू लागलेलंय. महाबळेश्वरच्या वेण्णालेक परिसरात सध्या अक्षरशः ढग पाण्यावर उतरताना पाहायला मिळताय.

याचा आनंद लुटण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातुन पर्यटक इथे गर्दी करताना पाहायला मिळतायत. समुद्र सपाटीपासून साधारण 4000 फूट उंचीवर असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. या पावसामुळे आजूबाजूच्या डोंगरांनी तर अक्षरशः हिरव्या रंगाची शाल पांघरल्याचा भास होतोय.

हा सगळा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी आणि पावसाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची इथे मोठी गर्दी होताना पाहायला मिळतेय. 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com