जाणून घ्या मॉन्सूनने किती टक्के महाराष्ट्र व्यापलाय ?

जाणून घ्या मॉन्सूनने किती टक्के महाराष्ट्र व्यापलाय ?

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. २५) मंबईसह राज्याचा सर्व भागात दाखल होत संपुर्ण महाराष्ट्र व्यापला. यंदा महाराष्ट्रातील आगमन उशिराने होत १९७२ नंतर उशिरा २० जून रोजी मॉन्सून तळकोकणात पोचला. त्यानंतर वेगाने वाटचाल करत, पाच दिवसात राज्य व्यापले. मात्र साधारणतः १५ जून रोजी राज्य व्यापणाऱ्या मॉन्सूनला यंदा दहा सर्व महाराष्ट्रात पोचण्यास १० दिवस उशीर झाला.

राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने वाटचाल सुरू केली आहे. गुरुवारी (ता. २०) कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पोचणाऱ्या मॉन्सूनचा मजल दरमजल प्रवास सुरूच आहे. रविवारी (ता. २३) मॉन्सूनने मध्य महाराष्ट्र, विदर्भाचा आणखी काही भाग, मराठवाड्याचा बहुतांशी भाग व्यापला. सोमवारी मॉन्सूनने मराठवाडा, विदर्भ व्यापला, तर कोकण वाटचाल रेंगाळलेल्या मॉन्सूनने चार दिवसांनंतर वाटचाल करत अलिबागपर्यंत धाव घेतली. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, मालेगावपर्यंत मॉन्सूनने मजल गाठली होती. मॉन्सूनने मंगळवारी दक्षिण गुजरात, मध्यप्रदेशच्या आणखी काही भागापर्यंतचा टप्पा पुर्ण केला आहे.

Web Title :marathi news monsoon in maharashtra updates of rain and monsoon 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com