मान्सून ६ जूनला केरळात तर महाराष्ट्रात ११ ला होणार दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 15 मे 2019

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मॉन्सूनचे आगमन सर्वसाधारणच्या तुलनेत काहीसे उशिरा होणार आहे. मॉन्सून ६ जूनला केरळात दाखल होणार असून, यानंतर पाच दिवसांनी (११ जून) महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सर्वसाधारणपणे केरळात १ जूनला मॉन्सून दाखल होण्याचे संकेत असतात. काही वेळा तो आधी तर काही वेळा नंतरही दाखल होतो. यंदाही मॉन्सून पाच दिवस उशिरा दाखल होईल. यातही चार कमी-अधिक दिवसांची तफावत धरली जाते. आगमन उशिर होण्यात स्थानिक स्थितीतील हवामानातील बदलांचा सतत होणार प्रभाव मॉन्सून मार्ग प्रभावित करत असतो, यामुळे मॉन्सूनच्या निर्धारित तारखेपेक्षा कालावधीत फरक पडतो.

मॉन्सूनचे आगमन

वर्ष-  अंदाजित आगमन  प्रत्यक्ष आगमन
२०१४ ५ जून ६ जून
२०१५ ३० मे ५ जून
२०१६ ७ जून ८ जून
२०१७ ३० मे ३० मे
२०१८ २९ मे २९ मे

संबंधित बातम्या

Saam TV Live