आला रे आला, मान्सून आला.. मॉन्सून अंदमानात दाखल..

आला रे आला, मान्सून आला.. मॉन्सून अंदमानात दाखल..

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. १८) अंदमानात दाखल झाले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी मॉन्सून अंदमानात पोचला असून, वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भागापर्यंतचा भाग व्यापल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, यापूर्वीच दुष्काळाने होरपळणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) ६ जूनला केरळात आगमन होण्याचे पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले आहे. अंदमान निकोबार बेटसमूहावर १८ किंवा १९ मेपर्यंत मॉन्सून दाखल होण्याचे संकेत दिले होते. यंदा सहा दिवस उशिराने मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार असून, केरळातील आगमनानंतर मॉन्सूनची देशातील पुढील वाटचाल ठरणार आहे.

‘आयएमडी’ने मॉन्सूनच्या आगमनाचे पूर्वानुमान बुधवारी (ता. १५) जाहीर केले. देवभूमी केरळात ६ जूनपर्यंत मॉन्सून दाखल होणार असून, पूर्वानुमानानुसार आगमन अंदाजाच्या ४ दिवस अगोदर किंवा नंतर होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे. दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार मॉन्सून साधारणतः २० मे जवळपास अंदमान समुद्र आणि बेटांच्या दक्षिण भागात दाखल होतो. तर १ जूनला केरळमधून मॉन्सूनचे देशात आगमन होते. 

‘आयएमडी’कडून मॉन्सूनच्या केरळातील आगमनाचे पूर्वानुमान २००५ पासून वर्तविण्यात येते. वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्विपकल्पावरील पूर्वमोसमी पावसाची स्थिती, दक्षिण चीन समुद्रातून वातावरणात परावर्तित होणारा किरणोत्सर्ग, आग्नेय हिंद महासागरातील हवेच्या खालच्या थरात वाहणारे वारे, पूर्व विषुववृत्तीय हिंद महासागरातील हवेच्या वरच्या थरात वाहणारे वारे, नैर्ऋत्य प्रशांत महासागरातून वातावरणात परावर्तित होणारा किरणोत्सर्ग हे सहा घटक पूर्वानुमान वर्तविताना विचारात घेतले जातात. 

Web Title : marathi news monsoon reached at andaman IMD

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com