मोतीलाल व्होरा असतील काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष

 मोतीलाल व्होरा असतील काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर आता नव्या अध्यक्षांच्या निवडीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. याआधी, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होतं. पण आता या निवडीमध्ये नवा ट्विस्ट आला आहे.

नव्या अध्यक्षांच्या नावावर सहमती होत नाही तोपर्यंत मोतीलाल व्होरा हे काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष असतील. मोतीलाल व्होरा हे 91 वर्षांचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.

सोनिया गांधींनी सुशीलकुमार शिंदेंना अध्यक्षपदासाठी आग्रह केला असल्याच्या बातम्या असताना अध्यक्षपदाच्या यादीत सुशीलकुमार शिंदे, राजीव सातव अशी नावं होती. पण आता सुशीलकुमार शिंदे यांचं नावही वेटिंग लिस्टमध्येच गेल्याचं दिसतं आहे. तत्पूर्वी मोतीलाल व्होरा हे काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष असतील.

Web Title: Motilal Vora becomes interim Congress president after Rahul Gandhi's resignation

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com