शेअर बाजारात निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 मे 2019

मुंबई: शेअर बाजारात लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते आहे. सकाळाच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 900 अंशांची उसळी मारली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  300 अंशांची वाढ झाली होती. सध्या सेन्सेक्स 972.81 अंशांनी वधारला असून तो 38 हजार 903.58 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी सध्या 281.30 अंशांनीं वधारला असून तो 11 हजार 688.45 अंशांवर आहे. केवळ काही मिनिटात गुंतवणूकदारांच्या भांडवलात 3.2 लाख कोटींची भर पडली आहे. 

शेअर बाजाराने जोरदार उसळी मारल्यानंतर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रूपया देखील 73 पैशांनी वधारला आहे. रविवारी लोकसभा निवडणूक मतदानाचा अखेरचा सातवा टप्पा पार पडला. त्यानंतर विविध माध्यमांनी एक्झिट पोल जाहीर केले असून केंद्रात पुन्हा मोदी सरकार सत्तेत येत असल्याचे दिसत आहे. त्याचाच परिणाम म्हणून शेअर बाजारात देखील उत्साह संचारला आहे. 

Web Title: As exit polls suggest thumping victory for Modi

संबंधित बातम्या

Saam TV Live