Loksabha 2019: राष्ट्रवादीची यादी जाहीर; पार्थ पवार, अमोल कोल्हे आणि समीर भुजबळांना तिकीट

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 मार्च 2019

मावळ - पार्थ पवार 
शिरूर - अमोल कोल्हे 
नाशिक - समीर भुजबळ 
बीड - बजरंग सोनावणे
दिंडोरी - धनराज महाले

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील दहा उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज दुसरी यादी जाहीर केली. या यादीत पाच लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. यामध्ये मावळमधून पार्थ पवार,  शिरूर मधून अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ, बीडमधून बजरंग सोनवणे, तर  दिंडोरीमधून धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांची घोषणा केली. 

Web Title: NCP releases second list of candidates for Loksabha polls


संबंधित बातम्या

Saam TV Live